आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला

सांगा पाहू

views

2:58
हे सूर्यमालेचे चित्र पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. पृथ्वी सूर्यापासून तिस-या स्थानावर आहे. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान शुक्र हा ग्रह आहे. मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या पलीकडे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह आहेत. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून आहे. तुम्हाला हे माहीत आहेच की, वस्तूला स्वतःकडे खेचण्याची किंवा ओढण्याची क्षमता म्हणजेच ‘आकर्षण’ होय. अशीच शक्ती खगोलीय वस्तूंमध्ये असते. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीलाच ‘गुरुत्वाकर्षण’ शक्ती असे म्हणतात. सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुवाकर्षण शक्ती असते. तर ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती असते. त्या दोन्हींचा परिणाम म्हणून ग्रह सूर्याभोवती ठरावीक कक्षेतच परिभ्रमण करत असतात. तसेच उपग्रहसुद्धा ग्रहाभोवती परिभ्रमण करत असतात.