सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

माझी शाळा

views

2:58
तुमची शाळा कशी आहे याचा आढावा घेण्यासाठी पुढील उपक्रम करून पाहू. प्रत्येकाला आपली शाळा आवडायलाच पाहिजे. जसे आपले घर आपल्याला आवडते, ते आपण स्वच्छ ठेवतो, सुशोभित करतो, तशीच शाळासुद्धा आपल्या घराबाहेरचे असे आपले एक जग असते. म्हणून आपण आपल्या शाळेची आपल्या घरासारखी काळजी घ्यायला हवी.आपल्या शाळेच्या वर्ग खोल्या, शाळेचे मैदान, हे नेहमी स्वच्छ ठेवावे. वर्गामध्ये विविध तक्ते लावावेत. सुविचार लिहावा. प्रत्येक शाळेला एक स्वतंत्र अशी वेगळी ओळख असते. तसेच तुमच्या शाळेचीपण काही वैशिष्टये असतील.