सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

शाळेच्या विकासासाठी पालकांचे महत्त्व

views

2:25
शाळेच्या विकासासाठी आणि आपल्या मुलामुलींच्या विकासासाठी ज्याप्रमाणे शाळेतील शिक्षक महत्त्वाचे असतात त्याचप्रमाणे पालकही महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. आपल्या शाळेमध्ये पालक-शिक्षक सभा आयोजित करण्यात येते. या सभेत शाळेतील मुलांच्या परीक्षेच्या निकालाविषयी पालक–शिक्षक बोलत असतात. कधी शाळेमध्ये काही वस्तूंची गरज असेल तर त्याविषयी चर्चा होते. शाळेतील स्पर्धा, परीक्षा, यावरही चर्चा होते. शाळेमध्ये काही गोष्टींची कमतरता असेल तर चर्चेतून त्यावर मार्ग काढला जातो. आपल्या शाळेमध्ये सर्व पालकांचा सारखाच आदर केला जातो. शिक्षक सर्व पालकांशी व्यवस्थित बोलतात. कोणत्याही पालकांनी प्रश्न विचारले तरी आपले सर्व शिक्षक व्यवस्थित उत्तरे देतात. सगळ्या पालकांना सारखीच वागणूक देतात. मुलांनो, आपल्या शाळेप्रमाणेच सर्व शाळांमध्ये शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ असतात. या संघांमुळे शिक्षक-पालक यांच्यातील संबंध सुधारतात. शिक्षक पालकांमध्ये संवाद वाढतो. पालक शाळेच्या विविध उपक्रमांत, कार्यक्रमांत सहभाग घेतात. त्यामुळे शाळेच्या प्रगतीला हातभार लागतो. विविध समस्यांवर योग्य उपाययोजना करता येतात.