आपले घर व पर्यावरण

कसे करावे बरे?

views

2:20
प्रसंग : अजितच्या घरासमोर बांधकाम सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आवाज होतो आणि धूळ पसरते. अजितला व त्याच्या घरातल्यांना याचा खूप त्रास होतो आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी अजितने काय करावे? अजितने घराच्या सर्व खिडक्या व दरवाजे जेवढा वेळ बंद ठेवता येतील तेवढा वेळ बंद ठेवावेत. शिवाय धूळ रोजच्या रोज साफ करावी. आवाजापासून व धुळीपासून जितके आपल्याला स्वतःला वाचवता येईल तितकाच त्रास कमी होईल. माणसाच्या निवाऱ्यात काळानुरूप होत गेलेले बदल: जस-जसा काळात बदल होत गेला, तस-तसा माणसाच्या निवाऱ्यामध्येही बदल होत गेला. माणसाची उत्क्रांती ही माकडापासून झालेली आहे हे आपण अभ्यासलेच आहे. अगदी आरंभीच्या काळात वन्य माणूसही माकडाप्रमाणेच झाडाच्या आसऱ्यानेच राहत असे. त्यानंतर त्याला गुहेचा शोध लागला. नंतर तो दगडांच्या घरात राहू लागला. त्यानंतर लाकूड, पालापाचोळा यापासून बनवलेल्या नैसर्गिक घरात राहू लागला. त्यानंतर आता तो माती, विटा, सिमेंट याचा वापर करून मानव घरे बांधत आहे.