आपले घर व पर्यावरण

पर्यावरण पूरक घरे

views

3:45
सर्व सजीवांना म्हणजेच प्राणी असो किंवा मानव असो, त्यांना निवाऱ्याची गरज ही असतेच. माणसाप्रमाणेच इतर सजीवसुद्धा पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून स्वतःचा निवारा तयार करतात. उदाहरणार्थ चिमणी, कावळा हे पक्षी किंवा इतर प्राणी जे निवारे बनवितात ते पर्यावरणपूरक व तात्पुरते असतात. पर्यावरण पूरक व कायमस्वरूपी घरे आपल्याला सुद्धा बनविता आली पाहिजे. पर्यावरणपूरक घरे ही संकल्पना पर्यावरणाचा आदर करणारीच आहे. अशी पर्यावरणपूरक घरे हा एकप्रकारचा संकल्प केला तर खरच खूप वेगळा अनुभव आपल्याला मिळेल. या पर्यावरण पूरक घरांची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया. पर्यावरणपूरक घरांची काही वैशिष्ट्ये:- १) पर्यावरणपूरक घरामध्ये नैसर्गिक साधनांचा कमी प्रमाणात वापर करण्यात येतो. २) अशा घरांमध्ये बायोगॅस, पवनऊर्जा, सौरऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जासाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यात येतो. ३) पाण्याचा पुनर्वापर करण्यात येतो. जसे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी झाडांना देणे. किंवा परत काही प्रमाणात वापरात आणणे. ४) ज्या वस्तू टाकाऊ आहेत त्या वस्तूंचा पुनर्वापर केला जातो. ५) अशा पर्यावरणपूरक घरांमध्ये कृत्रिम साहित्य किंवा कृत्रिम रंग यांचा वापर करण्यात येत नाही. ६) पर्यावरणपूरक घरांमध्ये नैसर्गिक प्रकाश व नैसर्गिक हवा खेळती राहण्यासाठी व्यवस्था केलेली असते.