स्वातंत्र्यप्राप्ती

प्रस्तावना

views

2:44
१९३९ ते १९४५ या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्याचा लढा व्यापक झाला होता. अनेक क्रांतिकारकांपासून ते सामान्य भारतीय जनतेपर्यंत सर्वजण या लढ्यात सहभागी झाले होते. १९४२ च्या छोडो भारत चळवळीने भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढला होता. त्यामुळे त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकारने केलेल्या विविध योजनांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. ‘मुस्लीम लीग’ ची स्थापना: मुलांनो राष्ट्रीय सभेची उभारणी ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर झाली होती. राष्ट्रीय सभेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या राष्ट्रीय आंदोलनात सर्व जाती-धर्मांचे लोक सामील झालेले होते. ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली होती. तिला रोखणे इंग्रजांना अशक्य वाटू लागल्याने ती कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब केला.