स्वातंत्र्यप्राप्ती

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

views

2:58
माउंटबॅटन यांच्या योजनेच्या आधारे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे विधेयक इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये अॅटली सरकारने मांडले. अवघ्या चौदा दिवसांत तो दोन्ही सभागृहांनी मंजूर करून १८ जुलै, १९४७ रोजी त्याचे कायदयात रूपांतर झाले. त्यातील काही प्रमुख कलमे पुढीलप्रमाणे होती: 1) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्रे राष्ट्रे अस्तित्वात येतील. 2) १५ ऑगस्ट १९४७ नंतर हिंदुस्थानातील कोणत्याही प्रदेशावर इंग्लंड सरकारचा कोणताही अधिकार राहणार नाही. 3) संस्थानांवरील ब्रिटिशांची मालकी संपुष्टात येईल. तसेच ब्रिटिश सरकारचे संस्थानांशी झालेले सर्व करार रद्द करण्यात येतील. 4) संस्थानांनी भारत अगर पाकिस्तान यांच्यात सामील व्हावे अगर स्वतंत्र राहावे. अशा प्रकारच्या तरतुदी भारताच्या स्वातंत्र्याच्या कायदयात करण्यात आल्या.