स्वातंत्र्यप्राप्ती

प्रत्यक्ष कृतिदिन

views

3:22
पाकिस्तान निर्मितीची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले. बॅरिस्टर जिनांनी आता मुसलमानांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती करावी असा आदेश दिला. त्यानुसार १६ ऑगस्ट १९४६ हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले. बंगाल व सिंध या ठिकाणच्या मुसलमान मंत्रिमंडळांनी तर या दिवशी सार्वत्रिक सुट्टीच जाहीर केली. या दिवशी मुस्लीम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या. बंगाल प्रांतात नोआखाली येथे भीषण कत्तली झाल्या. हा हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजी आपल्या प्राणाची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता बंगाल प्रांतात गेले. तेथे त्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.