त्रिकोण रचना

प्रस्तावना

views

3:44
त्रिकोण रचना करण्यासाठी आवश्यक अशा तीन बाबी लागतात. तीन कोन व तीन बाजू यांपैकी फक्त दोन बाबी दिल्या आणि या व्यतिरिक्त त्या त्रिकोणासंबंधी आणखी काही माहिती दिली तर त्या माहितीचा आणि दिलेल्या दोन बाबींचा त्रिकोण कसा काढतात ते पाहूया. एखादा बिंदू दोन भिन्न रेषांवर असेल तर तो बिंदू त्या रेषांचा छेदनबिंदू असतो. या गुणधर्माचा पुढील रचनांमध्ये कसा उपयोग केला आहे ते आता आपण पाहू.