त्रिकोण रचना

रचना 2

views

4:09
आता आपण त्रिकोणाचा पाया व उरलेल्या दोन बाजूतील लांबीचा फरक आणि पायालागतचा एक कोन दिला असता. त्रिकोण रचना कशी करायची ते पाहू या. उदा2): ∆ ABC मध्ये बाजू BC=7 सेमी, B=40० आणि AC-AB= 3 सेमी आहे. तर ∆ ABC काढा. येथे AD = AC हे मिळण्यासाठी दोन एकरूप त्रिकोण काढावे लागतात. उकल: प्रथम कच्ची आकृती काढू. स्पष्टीकरण: BC=7 सेमी काढा. AC ही AB पेक्षा मोठी आहे (AC > AB). BC या रेषाखंडाच्या B बिंदूपाशी 40० कोन करणारा किरण BT काढता येतो. बिंदू A हा BT किरणावर आहे. किरण BT च्या विरुद्ध किरणावर बिंदू D असा घ्या की, BD = 3 सेमी असेल. आता AD= AB + BD = AB + 3सेमी = AC (कारण AC - AB=3 सेमी दिले आहे) ∴ AD= AC म्हणून A हा बिंदू रेख CD च्या लंबदुभाजकावर आहे.