त्रिकोण रचना

रचना 3

views

3:02
आता आपण त्रिकोणाची परिमिती आणि पायालगतचे दोन्ही कोन दिले असता त्रिकोण काढून पाहूया. कृती: रचनेच्या पायऱ्या 1)रेख PQ हा 11.3 सेमी लांबीचा रेषाखंड काढा. 2)बिंदू P पाशी 35० मापाचा कोन करणारा किरण काढा. 3)बिंदू Q पाशी 30० मापाचा कोन करणारा किरण काढा. 4)दोन्ही किरणांच्या छेदन बिंदुला A हे नाव द्या. 5)रेख AP व रेख AQ चे लंब दुभाजक काढा. ते रेषा PQ ला ज्याबिंदूत छेदतील त्यांना अनुक्रमे B आणि C ही नावे द्या. 6)रेख AB आणि रेख AC काढा. अशा प्रकारे ∆ ABC हा अपेक्षित त्रिकोण आहे.