आनुवंशिकता व उत्क्रांती

पुराजीव विषयक पुरावे

views

4:52
आता आपण पुराजीव विषयक पुरावे याविषयी माहिती अभ्यासुया. आपल्याला माहित आहे की, पूर, भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात सजीव जमिनीखाली गाडले गेले. कोट्यावधी वर्षांपूर्वी जे जीव जमिनीत गाडले गेले त्यांचे ठसे, किंवा सांगाडे जमिनीत सुरक्षित असतात. यांनाच ‘जीवाश्म’ असे म्हणतात. कार्बनी वयमापन: कार्बनी वयमापन ही एक कालमापनाची पद्धत आहे. प्राणी किंवा वनस्पती हे सतत कार्बनचे ग्रहण करत असतात. ज्यावेळेस ते मृत होतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे बंद होते. त्यांच्या मृत होण्याच्या त्या क्षणापासून कार्बन-14(C-14) चा ऱ्हास होण्याची प्रक्रिया सतत चालु राहते. कार्बन-12(C-12) हा किरणोत्सारी नसतो. त्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन-14(C-14) व कार्बन-12(C-12) यांच्या गुणोत्तराचे प्रमाण हे सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्यांच्यातील कार्बन-14(C-14)ची सक्रियता, आणि कार्बन-14(C-14) चे कार्बन-12(C-12) शी असणारे गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच ‘कार्बनी वयमापन’ असे म्हणतात. या कार्बनी वयमापनाचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो. याद्वारेच जीवाश्मांची कालनिश्चिती करतात व त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्याकाळच्या सजीवांची माहिती मिळवतात. यानुसारच अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा विकास झालेला दिसून येतो.