आनुवंशिकता व उत्क्रांती

जातिउद्भव

views

5:17
उत्क्रांतीमूळे प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच भाग आहे. जाती: नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणारा सजीवांचा गट म्हणजेच जाती (species) होय. प्रत्येक जातींची वैशिष्ट्ये ही ठरावीक असतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. त्यामुळे त्यांचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ हा वेगवेगळा असतो. त्यामूळेच त्यांची ही वैशिष्ट्ये टिकून राहतात. मात्र एका जातीपासून दुसरी नवी जात निर्माण होण्यासाठी जनुकीय बदल, भौगोलिक बदल आणि पुनुरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. जुन्या जातींपासून नवीन जातींचा उद्भव किंवा निर्मिती होण्याची प्रक्रिया म्हणजेच ‘जातिउद्भव’ होय. किंवा “जातीबदल किंवा जातीउद्भव म्हणजे एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण करण्याची प्रक्रिया होय”. सजीवांचे मोठया कालांतरासाठी भौगोलिक किंवा पुनरुत्पाद्नीय अलगीकरण झाले की, जातिबदल किंवा जातीउद्भव होत असतो. मानवी उत्क्रांती :- मानवाची उत्क्रांती झाली तेव्हा एकपेशीय जीव होते हे स्पष्ट झाले आहे. कारण उत्क्रांतीमूळे एकपेशीय सजीवांपासून विविध जीवांची जडणघडण झालेली दिसून येते.