भौमितिक रचना Go Back उदाहरण views 2:10 ∆ABC शी समरूप असणारा ∆A'BC' असा काढा, की AB: A'B= 5:7 असेल. यासाठी आपण आधी कच्ची आकृती काढूया. बिंदू B, A, A’ तसेच बिंदू B, C, C’ हे एकरेषीय घेऊ. म्हणजेच ∆ABC व ∆A'BC' या दोन त्रिकोणात B बिंदू सामाईक आहे. ∆ ABC ~ ∆ A^' BC^'आहे. आणि AB : A’B = 5.7 आहे. म्हणून ∆ ABC च्या संगत बाजू ∆ A^' BC^' च्या संगत बाजूंपेक्षा लहान असतील. रचनेच्या पायऱ्या: 1) ∆ ABC हा कोणताही एक त्रिकोण काढा. 2) रेख BC चे पाच समान भाग करा. किरण BC वर बिंदू C’ असा घ्या की, रेख BC’ ची लांबी रेख BC’ च्या एका भागाच्या सात पट असेल. 3) रेख AC ला C’ मधून समांतर रेषा काढा. ती रेषा किरण BA ला जेथे छेदते, त्या बिंदू ला A’ हे नाव द्या. पहा ∆ A^' BC^' हा ∆ ABC शी समरूप असलेला इष्ट त्रिकोण आहे. समरूप त्रिकोणाची रचना एक शिरोबिंदू असलेली त्रिकोण रचना उदाहरण दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे