भौमितिक रचना

दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे

views

4:16
आता आपण दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची ते पाहूया. 1) वर्तुळकेंद्राचा उपयोग करून स्पर्शिका काढणे. रचनेच्या पायऱ्या: 1) प्रथम केंद्र C असलेले एक वर्तुळ काढा. (कितीही त्रिज्या असलेले) त्या वर्तुळावर P हा एक बिंदू घ्या. 2) वर्तुळकेंद्र C पासून किरण CP काढून घ्या. त्या किरणाला CX हे नाव द्या. 3) आता आपल्याला बिंदू P मधून किरण CX ला लंबरेषा काढायची आहे. त्यासाठी कंपासामध्ये किरण CX या किरणाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. कंपासचे लोखंडी टोक C बिंदूवर ठेवून किरण CX ला एक कंस काढा. कंपासचे अंतर न बदलता लोखंडी टोक X बिंदूवर ठेवून विरुद्ध बाजूस एक कंस काढा. त्याला अनुक्रमे A व B हे नाव द्या. आता बिंदू A वर कंपासचे टोक ठेवून वरच्या व खालच्या बाजूला एक कंस काढा. तसेच कंपासचे टोक बिंदू B वर ठेवून पहिल्या कंसांना छेदणारे असे दोन कंस काढा. आता या दोन्ही कंसाच्या छेदनबिंदूमधून रेषा l काढा. रेषा l ही P बिंदूतून जाणारी अपेक्षित स्पर्शिका आहे. अशाप्रकारे आपण वर्तुळकेंद्राचा उपयोग करून वर्तुळाला स्पर्शिका काढू शकतो.