निर्देशक भूमिती

प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक

views

05:46
आपल्याला माहीत आहे की, χ आणि y या अक्षामुळे प्रतलाची चार विभागांत विभागणी होते आणि प्रत्येक भागाला अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा चरण म्हणतात. पहिल्या चरणात χ व y अक्षावर दोन्हीकडे धन संख्या आहेत. म्हणून पहिले चरण (+, +)(धन,धन) असे आहे. दुसऱ्या चरणात (χ अक्षावर ऋण व y अक्षावर धन आहे म्हणून (-, +) असे. तिसऱ्या चरणात χ व y अक्षावर दोन्हीकडे ऋण संख्या आहेत म्हणून (-, -) व चौथ्या चरणात χ व y अक्षावर अनुक्रमे धन व ऋण संख्या आहेत म्हणून (+, -) असे भाग पडतात. X-अक्षावरील प्रत्येक बिंदूचा Y निर्देशक शून्य असतो. Y-अक्षावरील प्रत्येक बिंदूचा χ निर्देशक शून्य असतो. आरंभ बिंदूचे निर्देशक (0,0) असतात. आता आपण एक उदाहरण पाहूया. उदा: खालील बिंदू कोणत्या चरणात आहेत किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते ओळखा. A(5, 7), B(-6, 4), C(4, -7), D(-8, -9), P(-3, 0), Q(0, 8).