निर्देशक भूमिती

रेषीय समीकरणाचा आलेख

views

04:59
आता आपण काही उदाहरणे सोडवू. उदा1: 2X– y + 1 = 0 हे एक दोन चलांतील सामान्यरूपातील समीकरण आहे. या समीकरणाचा आलेख काढू. उकल: 2X– y + 1 = 0 म्हणजेच y = 2χ + 1 हे समीकरण मिळेल. X ला काही किमती घेऊन त्यांवरून y च्या संगत किमती काढूया. उदाहरणार्थ, जर X = 0 ही किंमत समीकरणात ठेवली तर y = 1 ही किंमत मिळते. याप्रमाणे X च्या 0, 1, 2, 1/2, -2 या किमती घेऊन y च्या किंमती काढू. 1) (X =0 ही किंमत समीकरणात ठेवून.) y = 2X + 1 y = 2 × 0 + 1 y = 0 + 1 y = 1 2) (X =1 ही किंमत समीकरणात ठेवून.) y = 2 X+ 1 y = 2 × 1 + 1 y = 2 + 1 y = 3 3) (X=2 ही किंमत समीकरणात ठेवून.) y = 2 X +1 y = 2 × 2 + 1 y = 4 + 1 y = 5 4) (X= 1/2 ही किंमत समीकरणात ठेवून.) y = 2 X + 1 y = (2 × 1/2) + 1 y = 1 + 1 y = 2 5) (X = -2 ही किंमत समीकरणात ठेवून.) y = 2 X +1 y = (2 × -2) + 1 y = -4 + 1 y = -3 आता दिलेल्या सर्व किंमती वापरून आपण या समीकरणाचा आलेख काढू शकतो. प्रथम प्रतलात X अक्ष व y अक्ष काढून घ्या. त्यानंतर X अक्षावरील 0 व y अक्षावरील 1 हा बिंदू घ्या. नंतर X अक्षावर 1 व y अक्षावर 3 हा बिंदू घ्या. X अक्षावर 2 व y अक्षावर 3 हा बिंदू घ्या. X अक्षावर 1/2 व y अक्षावर 2 हा बिंदू घ्या. X अक्षावर -2 व y अक्षावर -3 हा बिंदू घ्या. हे सर्व बिंदू स्थापन करून सर्व बिंदूंतून जाणारी एक रेषा काढा. ही रेषा म्हणजे 2X – y + 1 = 0 या समीकरणाचा आलेख असेल. अशा प्रकारे आपण सामान्यरूपातील रेषीय समीकरणाचा आलेख काढू शकतो.