निर्देशक भूमिती

Χ-अक्षाला समांतर रेषा

views

05:20
प्रथम आलेख कागदावर प्रतलात Χ- अक्ष व Y अक्ष काढून घ्या व दिलेले बिंदू स्थापन करून घ्या. सर्व बिंदूचा y निर्देशक समान आहे. म्हणजेच 4 आहे. सर्व बिंदू जोडले तर रेषा तयार होते, म्हणून सर्व बिंदू एकरेषीय आहेत. या सर्व बिंदूंतून काढलेली रेषा χ अक्षाला समांतर असेल. रेषा DA वरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक समान म्हणजे 4 आहे. तो स्थिर आहे. म्हणून रेषा DA चे वर्णन y=4 या समीकरणाने करतात. कोणत्याही बिंदूचा y निर्देशक 4 असेल तर तो बिंदू त्या रेषेवर म्हणजे रेषा DA वर असेल. Χ-अक्षाला 4 एकक अंतरावर समांतर असलेल्या रेषेचे समीकरण y=4 आहे. χ =a ही Y-अक्षाला समांतर असणारी रेषा काढली आणि (a > 0) म्हणजेच χ अक्षाची धन बाजू असेल तर ती रेषा y अक्षाच्या उजवीकडे असते. जर (a < 0) म्हणजे χ अक्षाची ऋण बाजू असेल तर ती रेषा y अक्षाच्या डावीकडे असेल. Y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण χ = a या रूपात असते. 1) Χ-अक्षावरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 0 असतो. याउलट ज्या बिंदूचा y निर्देशक 0 असतो तो बिंदू Χ-अक्षावर असतो, म्हणून Χ-अक्षाचे समीकरण y = 0 असे लिहितात. 2) Y अक्षावरील प्रत्येक बिंदूचा χ निर्देशक 0 असतो. याउलट ज्या बिंदूचा χ निर्देशक 0 असतो तो बिंदू Y अक्षावर असतो, म्हणून Y अक्षाचे समीकरण χ = 0 असे लिहितात.