संभाव्यता

यादृच्छिक प्रयोग

views

04:54
यादृच्छिक प्रयोग: ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात, पण त्यांपैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही, सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते, अशा प्रयोगाला ‘यादृच्छिक प्रयोग’ असे म्हणतात. उदाहरणार्थ नाणे फेकणे: नाणे फेकीचा संभाव्य कौल हा छापा किंवा काटा हाच असतो. परंतु आपल्या बाजूने यातील नेमका कौल येईल हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यावेळी ही दोन्ही फलिते सत्य असतात. म्हणून नाणे फेकणे ही कृती यादृच्छिक प्रयोगाची कृती आहे. तसेच फासा फेकणे, 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे, खेळातील पत्त्यांच्या योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यांमधून एक पत्ता काढणे या सर्व यादृच्छिक प्रयोगाच्या कृती आहेत.