मेलिंग Go Back व्यावसायिक क्षेत्र आणि मेलिंग views 1:46 एखाद्या सणाच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र परिवाराला आपण शुभेच्छा देतो. यामधील मजकूर अथवा संदेश समानच असतो. पण प्रत्येकाचा पत्ता मात्र वेगवेगळा असतो. हा मजूकर आपल्याला वारंवार टाईप करावा लागू नये, यासाठी वर्ड प्रोसेसरमध्ये मेलिंग ही कमांड आहे. ह्या कमांडच्या मदतीने शुभेच्छा असणाऱ्या मजुकराची एक फाईल आणि मजकुरासोबत ज्यांना पत्र पाठवायची आहेत त्यांचा अॅड्रेसची एक फाईल अशा दोन फाईल्स तयार होतात. मेलिंगचा उपयोग जास्त प्रमाणात कंपन्यांमध्ये केला जातो. ऑफिसमधील अनेक कर्मचार्यांना वार्षिक सभेची सूचनादेण्यासाठी आणि त्यामध्ये चर्चेसाठी असणारे विषय कळविण्यासाठीसुद्धा मेलिंग कमांड उपयुक्त आहे. भागीदारी असणाऱ्या कंपन्यांमध्ये भागीदार सदस्यांना किती नफा अथवा लाभांश मिळेल तसेच वार्षिक अहवाल देण्याकरिता ही कमांड फायदेशीर आणि वेळेची बचत करणारी ठरते. व्यावसायिक क्षेत्र आणि मेलिंग मेलिंग कमांड प्रकल्प हायपरलिंक