विभाज्य आणि विभाजकता

प्रस्तावना

views

4:12
आपण संख्यांवरील क्रियांचा अभ्यास केला. गुणाकार ,भागाकार ,बेरीज वजाबाकीच्या उदाहरणांचा सुद्धा अभ्यास केला. एकावरून अनेकांची किंमत काढण्यासाठी आपण गुणाकार आणि अनेकांवरून एकाची किंमत काढण्यासाठी आपण भागाकार करतो. तर मग आज आपण अशा काही उदाहरणांचा अभ्यास करून भागाकाराची उजळणी करूया. उदा. : अजय कडे 96 गोट्या आहेत. त्या गोट्या 12 मुलांना समप्रमाणात वाटायच्या असतील, तर प्रत्येक मुलाला किती गोट्या मिळतील. वरील उदाहरणात आपल्याला अनेकांवरून एकाची किंमत काढायची आहे . आणि एकूण गोट्या आहेत 96 आणि एकूण मुले आहेत 12 . चला तर मग आपण भागाकार करू. या साठी आपण प्रथम 12 च्या पाढ्यात 96 ही संख्या आहे का ते पाहिले. तर 12 च्या पाढ्यात 96 ही संख्या आहे. म्हणजेच 96 ला 96 ने नि:शेष भाग गेला आणि भागाकार 8 आला . म्हणून प्रत्येक मुलाला 8 गोट्या मिळतील. यामध्ये 12 हा 96 चा अवयव आहे. या गणितानंतर आपण विभाजक म्हणजे काय ते पाहू या. विभाजक म्हणजे :- जेव्हा भागाकार करताना बाकी शून्य उरते तेव्हा भाजकाला विभाजक म्हणतात. एखादी संख्या ही दुसऱ्या संख्येचा विभाजक आहे का हे कसे ओळखायचे ते आपण खालील उदाहरणाच्या साह्याने पाहूया. उदा- 4 हा 80 चा विभाजक आहे का ते पाहूया. म्हणजेच येथे आपल्याला 80 ला 4 ने भाग लावावा लागेल . या उदाहरणात भागाकार 20 व बाकी शून्य आहे. बाकी शून्य आहे म्हणजेच 80 ला 4 ने नि:शेष भाग जातो .म्हणजेच 4 हा 80 चा विभाजक आहे