विभाज्य आणि विभाजकता Go Back विभाज्यतेची दुसरी कसोटी views 3:24 विभाज्यतेची दुसरी कसोटी : 10 ची कसोटी :- ज्या संख्येच्या एककस्थानी 0 हा अंक असेल त्या संख्येला 10 ने भाग जातो. उदा: 50, 90, 520, 360, 1100, 2500. या सर्व संख्यांच्या एककस्थानी 0 हा अंक आहे. म्हणून या सर्व संख्यांना 10 ने नि:शेष भाग जाईल. म्हणूनच या सर्व संख्या 10 ने विभाज्य आहेत. शि: 7000 ही संख्या 10 ने विभाज्य आहे का ? वि: हो, आहे. कारण या संख्येच्या एककस्थानी 0 हा अंक आहे. म्हणून 7000 या संख्येला 10 ने नि:शेष भाग जातो. शि: बरं 7437 ही संख्या 10 ने विभाज्य आहे का ? शि: नाही. कारण 7437 या संखेच्या एकक स्थानी 0 हा अंक नाही. म्हणून या संख्येला 10 ने भाग जाणार नाही. आणि म्हणूनच ही संख्या 10 ने विभाज्य नाही. शि: खूपच छान ! म्हणजे तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या पूर्णपणे समजल्या आहेत. प्रस्तावना विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेची दुसरी कसोटी मूळ संख्या आणि संयुक्त संख्या सहमूळ संख्या इराटोस्थेनिसची पद्धत