विभाज्य आणि विभाजकता

विभाज्यतेच्या कसोट्या

views

3:28
विभाज्यतेच्या कसोट्या : आता आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहू. विभाज्यतेची पहिली कसोटी : 2 ची कसोटी : ज्या संख्येच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 यापैकी एखादा अंक असेल त्या संख्येला 2 ने भाग जातो किंवा ती संख्या 2 ने विभाज्य असते. उदा. 110 , 322, 4524, 3566, 7578 या सर्व संख्यांचे निरीक्षण करा. या सर्व संख्यांच्या एकक स्थानच्या संख्या या 0,2,4,6,8 यांपैकीच आहेत. आणि जर तुम्ही या संख्यांना भाग दिला तर सर्व संख्यांना भाग जाईल आणि बाकी शून्य राहील. विभाज्यतेची दुसरी कसोटी : 5 ची कसोटी :- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल त्या संख्येला 5 ने भाग जातो. उदा. 65, 40, 485 , 600, 2450, 3275 या सर्व संख्यांच्या एकक स्थानी 0, किंवा 5 आहे. म्हणजे या सर्व संख्यांना 5 ने नि:शेष भाग जाईल. म्हणून या सर्व संख्या 5 ने विभाज्य आहेत.