विभाज्य आणि विभाजकता

मूळ संख्या आणि संयुक्त संख्या

views

3:46
मूळ संख्या आणि संयुक्त संख्या : आता आपण मूळ संख्या आणि सयुक्त संख्या म्हणजे काय ते बघू या. त्या कशा ओळखायच्या तेही पाहूया . मूळ संख्या :- ज्या संख्येचे 1 व स्वत: ती संख्या असे दोनच विभाजक असतात, त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. उदा: 17 या संख्येचे विभाजक 1 आणि 17 याच संख्या आहेत. म्हणून १७ ही मूळ संख्या आहे. तसेच 37 या संख्येचे विभाजक 1 आणि 37 याच संख्या आहेत. म्हणून 37 ही देखील मूळ संख्या आहे. या दोन्ही उदाहणांत ती संख्या आणि एक फक्त दोनच विभाजक आहेत म्हणून 17 व 37 या दोन्ही मूळ संख्या आहेत. संयुक्त संख्या : ज्या संख्येचे विभाजक दोनपेक्षा जास्त असतात, त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. उदा. 24 या संख्येचे 1,2,3,4,6,8,12,24 हे विभाजक आहेत. म्हणजेच या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. म्हणून 24 ही संख्या संयुक्त संख्या आहे. तसेच 18 या संख्येचे विभाजक 1,2,3,6,9.18 हे आहेत. आणि ते 2 पेक्षा जास्त आहेत. म्हणून 24 ही देखील संयुक्त संख्या आहे.