म.सा.वि आणि ल.सा.वि

शाब्दिक उदाहरणे

views

3:01
शाब्दिक उदाहरणे : आता आपण यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणे सोडवू. 1)समजा 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या दोरखंडाचे प्रत्येकी सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत, तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती घ्यावी? म्हणजे आपल्याला 8 व 12 या दोघांचा म.सा.वि. काढायचा आहे. मग मला सांगा 8 चे विभाजक कोणते आहेत? वि: 1,2,4 आणि 8 हे 8 चे विभाजक आहेत. शि: छान ! आणि 12 चे विभाजक? वि: 1, 2, 3, 4,6,12. शि: मग या दोघांमध्ये सामाईक विभाजक कोणते आहेत? वि: सर या दोघांमध्ये 1,2 व 4 हे सामाईक विभाजक आहेत. शि: आणि यातील सर्वात मोठा विभाजक आहे 4. म्हणून प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त 4 मीटर घ्यावी. आता तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. त्याचे उत्तर तुम्हीच काढायचे आहे आणि ते कसे काढले तेही सांगायचे आहे. उदा. चंद्रपूर मधील ताडोबा व्याघ्रप्रकल्प पाहण्यासाठी ६ वी व 7 वी च्या वर्गातील अनुक्रमे 140 व 196 विद्यार्थी सहलीला गेले. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समान गट करायचे आहेत. प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो. तर प्रत्येक गटात किती विद्यार्थी असू शकतील? प्रत्येक गटात जास्त विद्यार्थी घेण्याचे कारण काय असू शकेल? वि: सर यामध्ये आपल्याला 140 आणि 196 चा म.सा.वि. काढायचा आहे. म्हणून आधी 140 चे विभाजक काढले. ते 1,2,4,5,7,10,14,20,28,35,70,140. असे आले. नंतर 196 चे विभाजक 1,2,4,7,14,28,49,आणि 196 असे काढले. त्यानंतर 140 व 196 चे सामाईक विभाजक काढले. ते होते 1, 2, 4, ७, 14 आणि 28. नंतर यातील सर्वात मोठा सामाईक विभाजक शोधला. आणि तो आहे 28. म्हणून प्रत्येक गटात जास्तीत जास्त 28 विद्यार्थी संख्या असावी. म्हणजे प्रत्येक गटातील विद्यार्थी संख्या समान राहील.