म.सा.वि आणि ल.सा.वि

सरावासाठी उदाहरणे

views

4:38
ल.सा.वि काढण्याची काही उदाहरणे पाहू.उदा 1. चला, आपण 9, व 15 यांचा ल.सा.वि काढू .यासाठी आपण प्रथम 9 चे विभाज्य लिहू . ते आहेत 9,18,27,36,45,54,63,72,81,90,99......नंतर15 चे विभाज्य लिहू. ते आहेत 15,30,45,60,75,90,105........आता दोघांमधील सामाईक विभाज्य शोधू, यातील सामाईक विभाज्य आहे = 45 व 90. आणि सगळ्यांत लहान विभाज्य आहे 45. म्हणून 9 ,व 15 यांचा ल.सा.वि = 45 आहे.उदा 2 : 2,3,5 यांचा ल.सा.वि. काढा .2 ने विभाज्य असणार्या संख्या आहेत 2,4,6,8,10,12,14,16,18,20,22,24,26,28,३०,32,34,36,38,40........3 ने विभाज्य असणार्या संख्या आहेत 3,6,9,12,15,18,21,24,27,३०,३३,36,39,42,45,48..... 5 ने विभाज्य असणार्या संख्या आहेत 5,10,15,20,25,३०,35,40,45,50,55,60.......या तिघांमधील सर्वात लहान सामाईक विभाज्य संख्या आहे ३०. म्हणून 2,3 व 5 चा ल.सा.वि. आहे ३०.