गती व गतीचे प्रकार

गती

views

2:56
मुलांनो एखाद्या स्थिर वस्तूवर बल लावले तर ती वस्तू आपली जागा सोडते. तिच्या अशा अवस्थेला गतिमान अवस्था म्हणतात. म्हणजेच एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते तेव्हा ती गतिमान असते. ठराविक वेळेत वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन म्हणजेच वस्तूची गती होय. पाहणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल, तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात.