गती व गतीचे प्रकार

गतीचे प्रकार

views

3:53
वस्तूला गती दिली की वस्तूंमध्ये हालचाल घडून येते. हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. ही गती वेगवेगळ्या प्रकारची असते. त्याचीच माहिती घेणार आहोत. गतीचे दोन प्रकार आहेत १. रेषीय गती. आणि २. नैकरेषीय गती. रेषीय या शब्दावरून आपल्याला लक्षात येईल की ही गती ‘रेषेसारखी सरळ’ या शब्दाशी संबंधित आहे. रांगेतून जाणाऱ्या मुंग्या एकाच दिशेने जाताना दिसतात. त्यांच्या या गतीला रेषीय गती असे म्हणतात. नैकरेषीय या शब्दावरूनच आपल्या लक्षात येईल की नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले. म्हणजे एका सरळ रेषेत न जाणाऱ्या गतीस ‘नैकरेषीय गती’ असे म्हणतात.