गती व गतीचे प्रकार

नियतकालिक गती

views

4:41
आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की काही वस्तू ठराविक वेळेत एक फेरी पूर्ण करतात. म्हणजेच एक आंदोलन पूर्ण करतात. पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. घड्याळाच्या तास काट्याला 1 फेरी पूर्ण करण्यास १२ तास लागतात. फेरी पूर्ण करताना गतिमान वस्तू एका विशिष्ट बिंदुतून जाते. आणि फेरी पूर्ण झाल्यावर त्याच बिंदूवर येते. तर ज्या गतीमध्ये गतीमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदुतून पुन्हा जाते, त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात”.