बल व बलाचे प्रकार

प्रस्तावना

views

4:02
प्रत्येक सजीवाला शक्तीची, ताकदीची आवश्यकता असते. वस्तू उचलण्यासाठी, हलवण्यासाठी, वस्तूंचा आकार बदलण्यासाठी आपल्याला शक्तीची गरज असते. यालाच आपण बल असे म्हणतो. “वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास ‘बल’ असे म्हणतात.” कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही. वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असतेच. गतीमान वस्तूंची दिशा बदलण्यासाठी किंवा गतिमान वस्तू थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो.