बल व बलाचे प्रकार

गुरुत्वीय बल

views

4:21
‘पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात.’ पृथ्वी स्वतःकडे वस्तूला खेचते कारण पृथ्वीमध्ये गुरुत्वीय बल आहे. परंतु पृथ्वीचे हे गुरुत्वीय बल ठराविक उंचीवर जाईपर्यंतच असते. ठराविक उंचीवर गेल्यानंतर हे गुरुत्वीय बल काम करत नाही. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूंची गती कमी-कमी होत जाते. आणि शेवटी ती शून्य होते. मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडते. खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळेच सतत वाढ होत जाते.