कार्य आणि ऊर्जा

क्रिया करून पाहा

views

3:41
एक पेटी घ्या. तिला दोरी बांधा. दोरीच्या साहाय्याने ती रिकामी पेटी ओढत 10 मीटर सरळ रेषेत चाला. आता आपण त्याच पेटीमध्ये 20 पुस्तके भरू. पाहा आपली पेटी थोडी जड झाली आहे. आता पुन्हा दोऱ्याच्या साहाय्याने ती पेटी ओढत 10 मीटर सरळ रेषेत चाला. आता हीच पुस्तकांनी भरलेली पेटी घेऊन 20 मीटर अंतर चाला. आता सांगा बरं, या क्रियांमधील कार्यांमध्ये काय फरक आहे ते पाहूयात?