कार्य आणि ऊर्जा

ध्वनी ऊर्जा

views

5:10
ध्वनी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रेडीओ ऐकताना, टीव्ही पाहताना ध्वनी महत्त्वाचा ठरतो. घड्याळाचा गजर, घराची बेल, गाडीचा होर्न, शाळेची घंटा इत्यादी मध्ये ध्वनी उर्जेचा वापर होतो. तुम्ही एका हाताने टाळी वाजविण्याचा प्रयत्न करा. पाहा वाजते का? नाही ना ? आता दुसरा हात पहिल्या हातावर मारा. बघा काय झाले? आता टाळी वाजली. म्हणजेच आवाज निर्माण होण्यासाठी व्हायब्रेशन म्हणजेच तरंग महत्त्वाचे असतात. या तरंगांतूनच आवाजाची निर्मिती होत असते. जेंव्हा दोन्ही हात एकमेकांवारती आदळले तेव्हा त्यामध्ये तरंग निर्माण होवून त्यात ध्वनी निर्माण झाला. सतार, वीणा, तबला, मृदुंग, ढोलकी या सर्वांतून ध्वनी निर्माण होतो.