वैदिक संस्कृती

वैदिक वाड्मय

views

4:01
‘वेद’ वाड्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. वैदिक संस्कृतीचे संस्थापक आर्य होते. वैदिक काळ हा १५०० ई.पू. ते १६०० इ.पू मानला जातो. गोपाळ कृष्ण गोखले म्हणतात , आर्य हे उत्तर ध्रुवाकडून आलेले आहेत. तर काही विद्वान आर्य हे युरोपमधील कॅस्पियन सागर क्षेत्रात राहणारे निवासी होते . वेद हे भारतीय संस्कृतीतील आणि जगातीलही प्राचीन साहित्य मानले जाते. वेदाची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रींयांनी रचलेली आहेत. एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला ‘सुक्त’ असे म्हणतात. वैदिक वाड्मयाची भाषा संस्कृत असून हे वाड्मय अत्यंत समृद्ध आहे. वैदिक वाड्मयातील ऋग्वेद हा मूळ ग्रंथ मानला जातो व तो काव्यरूप आहे. वैदिक वाड्मयात एकूण चार वेद आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. या चार वेदांच्या ग्रंथांना ‘संहिता’ असे म्हणतात. ‘विद्’ म्हणजे जाणणे. आणि ‘विद्’ या शब्दापासून ‘वेद’ ही संज्ञा तयार झाली. ‘वेद’ म्हणजे ज्ञान असा त्याचा अर्थ होतो. वेद हे लिखित साहित्य नव्हते. गुरु – शिष्य परंपरेने ते मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपविले गेले. म्हणूनच मौखिक पठणाच्या आधारे म्हणजेच तोंडी पाठांतराच्या आधारे त्यांचे जतन केले गेले. वेदांना ‘श्रृति’ असेही म्हणतात.