वैदिक संस्कृती

ब्राहमणग्रंथ

views

3:9
वैदिक काळात यज्ञ विधींना खूप महत्त्व दिले जात असे. यज्ञाविषयीची माहिती या ग्रंथामध्ये दिली आहे . यज्ञविधीमध्ये वेदाचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथाना ब्राहमणग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र्य ब्राहमणग्रंथ आहेत.आरण्यके : अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन ‘आरण्यक’ ग्रंथांमध्ये मांडलेले आहे. कोणतेही काम करत असतांना ते काम व्यवस्थित झाले पाहिजे असाच हेतू असतो. त्यामुळे त्या काळात यज्ञविधी पार पाडताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेत असत. आरण्यकांमधून देवाची भक्ती कशी करावी हे सांगितले आहे. तसेच मन, काया, आत्मा, पुर्नजन्म, इत्यादींचा वेध घेतला आहे.उपनिषदे : असे म्हणतात ‘गुरुशिवाय’ ज्ञान नाही, म्हणूनच गुरूला प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान असते. ‘उप’ या उपसर्गाचा अर्थ आहे जवळ आणि ‘सद’ याचा अर्थ आहे बसणे. गुरुंच्या जवळ बसून परमार्थ विद्या समजून घेणे म्हणजेच ‘उपनिषद्’ होय. जन्म मुत्यूसारख्या घटनांबद्दल तसेच ब्रह्म काय आहे? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते? आत्मा म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांची सविस्तर चर्चा उपनिषदांमध्ये केली आहे. एकूनच अध्यात्म, दैव, तत्वज्ञान ह्यांची चर्चा विविध उपनिषदांतून आढळते. वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते. काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत. उपनिषदे तत्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात.