वैदिक संस्कृती

शेती, पशुपालन

views

4:43
वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. शेतीमध्ये काम करण्यासाठी बैलांचा उपयोग होत असे. अनेक बैल नांगराला जुंपून शेतीची नांगरणी केली जाई. नांगराला नांगरण्यासाठी लोखंडाचा’ फाळ बसवत असत. नांगरणे म्हणजे जमिनीतील माती भुसभुशीत व मोकळी करणे. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस म्हणजेच नाश करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. शेतीसाठी खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा, या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गाईचा विनिमयासाठी उपयोग केला जाई. विनिमय म्हणजे आपल्याकडील गाय दुसऱ्या व्यक्तीला देऊन त्याच्याकडील वस्तू आपल्याला घेणे. या विनिमयामुळे गाईंना खूप महत्त्व आणि किम्मत होती. गाई चोरून नेऊ नयेत म्हणून त्यांची विशेष काळजी घेतली जात असे. या गाईंवर 'आम्हाला भरपूर गोधन प्राप्त होऊ दे' अशा ऋचा लिहिल्या आहेत. या काळात गाईंप्रमाणेच घोड्यालाही विशेष महत्त्व होते. कारण घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. त्यामुळे रथ चालवण्यासाठी ह्या प्राण्याचा उपयोग केला जात असे. यासाठी वेदकालीन लोक घोड्याला माणसाळवत असत. आणि मग त्यांना रथाला जोडीत असत. यात ते तरबेज झाले होते. त्यावेळी रथांची चाके आरयांची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्याचे चाक वजनाने हलके असते. आणि त्यामुळे आरयांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान असत. वैदिक काळात शेती आणि पशुपालन या व्यवसायांशिवाय इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. जसे प्रसाधन द्रव्ये, चंदन व हस्तिदंताची निर्यात करणे, तसेच उत्तम जातिवंत घोडे व आभूषणे आयात करणे इत्यादी.