वैदिक संस्कृती

वेदकालीन लोकांचा आहार

views

3:40
. वेद्कालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. तृणधान्य म्हणजे ज्या धान्यांची रोपे ही गवतासारखी असतात ती धान्ये होत. वैदिक वाङ्मयात ‘यव’, ‘गोधूम’, ‘व्रीहि’ यासारखे शब्द आढळतात. तर यव म्हणजे सातू म्हणजेच बार्ली. गोधूम म्हणजे गहू. आणि व्रीही म्हणजे तांदूळ. या धान्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. दूध, दही, लोणी ,तूप, मध हे पदार्थ तर त्यांच्या आवडीचे होते. तसेच उडीद, मसूर, तीळ, आणि मांस यांसारख्या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रेही वापरत. तसेच त्या काळात प्राण्यांच्या कातड्याचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जात असे. सर्वांनाच अलंकार आवडतात. त्याचप्रमाणे त्या काळातील स्त्री-पुरुषही अलंकार म्हणून विविध फुलांच्या माळा, मण्यांच्या माळा वापरत असत. तसेच सोन्याचे दागिनेही वापरत असत. वेदकालीन सोनार स्त्रियांसाठी कुरीरम्, ओपश म्हणजे केसांत माळली जाणारी आभूषणे ; निष्क, निष्कग्रीव म्हणजे गळ्यात घातले जाणारे, तसेच हिरण्यकंठी, सुवर्णशतकंठी यांसारखे दागिने घडवीत असत. या सर्व दागिन्यांपैकी ‘निष्क’ नावाचा गळ्यातील दागिना हा विशेष लोकप्रिय असावा कारण त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी- विक्रीसाठीही केला जात असे. माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत. वेदकाळात गायन ,वाद्य , नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार यांसारख्या मनोरंजनाच्या साधनांचा वापर करीत असत. वाद्यांमध्ये वीणा शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. तसेच डमरू आणि मृदुंग ही तालवाद्येही ते वापरत असत. तर अशी होती वेदकाळातील जीवन पद्धती.