शहरी स्थानिक शासन संस्था

नगरपंचायत

views

3:50
गावामध्ये अत्याधुनिक सुखसुविधा उपलब्ध करून दिल्यास, रोजगार उपलब्ध करून दिल्यास गावाचे रुपांतर हळूहळू शहरामध्ये होते. शहर होण्याच्या या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. असे गाव पूर्णतः शहर नसते व खेडेही नसते. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय. नगरपंचायतीची दर पाच वर्षांनी निवडणूक होते. नगर पंचायतीतील सदस्य संख्या ९ ते १५ असते. या प्रभागांतून प्रत्येकी १ सदस्य निवडला जातो. त्यातून निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. निवडणुकीनंतर सर्वच स्थानिक शासन संस्थांना काही आवश्यक कामे पार पाडावी लागतात. नगर पंचायत स्थापन होण्यासाठी ते गाव जवळच्या महानगरपालिका शहरापासून २० किमी पेक्षा कमी अंतरावर असले पाहिजे. . तेथील २५% लोक शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायांवर अवलंबून असले पाहिजेत. तसेच लोकसंख्या १०,००० ते २५,००० असली पाहिजे.. सध्या महाराष्ट्रात तीन नगरपंचायती आहेत. १) दापोली (रत्नागिरी) २) शिर्डी (अहमदनगर) ३) कणकवली (सिंधुदुर्ग)