शहरी स्थानिक शासन संस्था Go Back नगरपरिषद views 3:39 शहरी नागरी शासन संस्थांपैकी आपण नगर पंचायतीची माहिती पाहिली. आता आपण नगरपरिषदेची माहिती घेऊ. जी शहरे आकाराने लहान आहेत , अशा शहरांसाठी नगरपरिषद हे स्थानिक शासन केले जाते. १०,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगरपरिषदेची स्थापना केली जाते. १०,००० ते ३०,००० लोकसंख्येसाठी ‘क’ वर्ग नगरपरिषद असते. ३०,००० ते ७५,००० लोकसंख्येसाठी ‘ब’ वर्ग नगरपरिषद असते. तर ७५,००० पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ‘अ’ वर्ग नगरपरिषद असते. नगरपरिषद बरखास्त करण्याचा अधिकार राज्यशासनास असतो. नगर परिषदेचा कालावधी ५ वर्षांचा असतो. म्हणजेच दर पाच वर्षांनी नगरपरिषदेच्या निवडणुका होतात. निवडून आलेल्या प्रतिनिधीला नगरसेवक असे म्हणतात. ते आपल्यापैकी एकाची नगराध्यक्ष व एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करतात. अध्यक्षाला विविध कामे करावी लागतात. नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी १७ असते व जास्तीत जास्त ३८ असते.महाराष्ट्रात अलिबाग, कराड, बदलापूर, रत्नागिरी या शहरांमध्ये नगरपरिषदा आहेत. नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका महानगरपालिकेचे प्रशासन