शहरी स्थानिक शासन संस्था

महानगरपालिकेचे प्रशासन

views

2:41
महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. महापालिका आयुक्त हे महत्त्वाचे पद असते. त्याची नियुक्ती महाराष्ट्र राज्य शासनाकडून करण्यात येते. शहरातील विविध मूलभूत सेवा – सुविधांचे परिरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते.महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करतो.उदा. : एखाद्या महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त करतो. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तो तयार करतो. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकींना तो उपस्थित राहतो. महानगर पालिका हद्दीतील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका लोकांनकडून काही कर गोळा करते. जसे घरावरील कर म्हणजेच घरपट्टी, मालमत्ता कर ज्याला आपण propertyproperty tax बोलतो, पाण्यावरील कर ज्याला पाणीपट्टी असे म्हणतात, व्यवसायावरील कर, मनोरंजन कर आणि शासनाकडून मिळणारे अनुदान. तर या सर्वांमधून जो पैसा जमा होतो त्यातूनच महानगरपालिकेची कामे केली जातात.