पृथ्वी आणि वृत्ते Go Back पृथ्विगोल आणि कोनीय अंतर views 2:35 नकाशा पहा आणि या नकाशाचे निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे पाहू. याचा अर्थ पृथ्वीवरील एखादी वस्तू निश्चित अशा एका ठिकाणी असते. परंतु, पृथ्वीवरील निरनिराळ्या स्थानी असणाऱ्या व्यक्तींनी स्वत:च्या स्थानावरून एखाद्या विशिष्ट वस्तूची दिशा सांगितली असता ती वेगवेगळी येते. म्हणजेच दिशांचा व उपदिशांचा वापर करून स्थान सांगणे अचूक ठरेलच असे नाही. पृथ्वीचे आकारमान प्रचंड आहे. त्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचे स्थान नेमकेपणे सांगता यावे याकरिता मानवाने पृथ्वी ची प्रतिकृती म्हणजे पृथ्विगोल तयार केला. कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिले जाते.त्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा काढतात. ही रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोन करते. हे कोनीय अंतर स्थान निश्चितीसाठी वापरले जाते. पृथ्विगोल आणि कोनीय अंतर पृथ्वीगोल कोनीय अंतर विषुववृत्त पृथ्वीची कोनीय मापे रेखावृत्ते आकृतीच्या सहाय्याने पाहू वृत्तजाळी