पृथ्वी आणि वृत्ते Go Back विषुववृत्त views 2:28 पृथ्वीगोलाच्या बरोबर मध्यावर असलेल्या o00 च्या अक्षवृत्तालाच विषुववृत्त असे म्हणतात. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात. म्हणजेच ज्या वृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात त्याला विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकड़े अक्षवृत्ते आकाराने लहान लहान होत जातात. जे अक्षवृत्त पृथ्वीगोलावर उत्तर गोलार्धात टोकाला बिंदुस्वरुप असते त्याला उत्तरध्रुव असे म्हणतात. तर पृथ्वीगोलावर दक्षिण गोलार्धात टोकाला असणाऱ्या अक्षवृत्ताला दक्षिण ध्रुव असे म्हणतात. दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, मध्य आफ्रिका आणि इंडोनेशियन द्वीपसमूहांत जमिनीवरून, तर अन्यत्र समुद्रातून विषुववृत्त गेलेले आहे. विषुववृत्त हे शून्य अंशाने दर्शविले जाणारे आणि सर्वांत मोठे अक्षवृत्त आहे. विषुववृत्तावर असणाऱ्या सर्व स्थानांचे पृथ्वीगोलातील मध्यबिंदूपासून कोनीय अंतर शून्य अंश असल्याने त्यांचे अक्षांश शून्य अंश असते. विषुववृत्तावरील दिनमान व रात्रीमान नेहमीच समसमान म्हणजे १२-१२ तासांचे असते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य विषुववृत्तावर येतो, त्या दिवशी पृथ्वीवरील सर्व ठिकाणी दिनमान व रात्रीमान समसमान असते. पृथ्विगोल आणि कोनीय अंतर पृथ्वीगोल कोनीय अंतर विषुववृत्त पृथ्वीची कोनीय मापे रेखावृत्ते आकृतीच्या सहाय्याने पाहू वृत्तजाळी