पृथ्वी आणि वृत्ते

आकृतीच्या सहाय्याने पाहू

views

3:26
नकाशाचे निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.पृथ्वीच्या केंद्रापासून अंशात्मक अंतराच्या साहाय्याने तयार झालेली आणि पूर्व – पश्चिम दिशेत असलेली काल्पनिक वर्तुळे, म्हणजे ‘अक्षवृत्ते’ होत. किंवा असेही म्हणता येईल की पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. अशी अनंत वर्तुळे (अक्षवृत्ते) काढणे शक्य होते.अक्षवृत्ते ही कोनीय अंतर मोजून काढलेली असल्यामुळे त्यांची मूल्ये अंशांत सांगितली जातात. या मूल्यांना ‘अक्षांश’ म्हणतात.सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. अक्षवृत्ते या काल्पनिक वर्तुळाकार आडव्या रेषा असतात.०० चे सर्वात मोठ्या आकाराचे अक्षवृत्त, म्हणजे विषुववृत्त होय. त्याला ‘मूळ अक्षवृत्त’ असेही म्हणतात. पृथ्वीगोलावरील ज्या वर्तुळाची पातळी गोलमध्यातून जाते त्या वर्तुळाला ‘बृहतवृत्त’ म्हणतात. विषुववृत्त हे एक बृहतवृत्त च आहे.विषुववृत्ताकडून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते. पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना अक्षवृत्ते बिंदूस्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे ‘उत्तर ध्रुव’ आणि ‘दक्षिण ध्रुव’ म्हणतात