परिमिती व क्षेत्रफळ

शाब्दिक उदाहरणे

views

5:11
शाब्दिक उदाहरणे : मुलांनो, तुम्हाला आता आयताची आणि चौरसाची परिमिती कशी काढायची ते कळले आहे. तर यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणे आपण सोडवू या. उदा. 1) समजा एका आयताकार क्रीडांगणाची लांबी 200 मी व रुंदी 120 मीटर आहे तर त्या क्रीडांगणाची परिमिती किती होईल? वि: या उदाहरणामध्ये लांबी 200 मी आणि रुंदी 120 मीटर दिली आहे. म्हणून आयताची परिमिती = 2 X लांबी + 2 X रुंदी = 2 X 200+ 2 X 120 = 400 + 240 = 640 मीटर म्हणून क्रीडांगणाची परिमिती= 640 मी होईल. शि: छान ! उदा. 2) एका आयताकार बागेची लांबी 100 मी व रुंदी 80 मी आहे तर त्या बागेची परिमिती किती होईल? वि: बागेची रुंदी = 80 मी आणि लांबी =100 मी आहे. आयताची परिमिती =2 X लांबी + 2 X रुंदी = 2 X 100+ 2 X 80 = 200+ 160 = 360 मी म्हणून बागेची परिमिती = 360 मी होईल. शि: अगदी बरोबर !