परिमिती व क्षेत्रफळ

शाब्दिक उदाहरणे

views

3:7
शाब्दिक उदाहरणे : मुलांनो, तुम्हाला आयताचे आणि चौरसाचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे आता समजले आहेच. तर आता आपण यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणे सोडवू.उदा.1 ) शि: समजा एका चौरसाकार खोलीची बाजू 4 मीटर आहे. त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी एका चौरसमीटरला 35 रुपये प्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल?शि: मुलांनो, यासाठी सर्वप्रथम आपल्याला चौरसाकार खोलीचे क्षेत्रफळ काढावे लागेल. चला तर मग सूत्राचा वापर करून क्षेत्रफळ काढून घेऊ : चौरसाचे क्षेत्रफळ = बाजूX बाजू = 4X4 = 16 चौ सेमी म्हणजेच या खोलीचे क्षेत्रफळ आहे 16 चौ सेमी.एक चौरस मीटर ला 35 रुपये खर्च येतो. म्हणून एकूण मजुरी काढण्यासाठी खोलीचे क्षेत्रफळ आणि एका चौरस मीटरला येणारा खर्च यांचा गुणाकार करू.म्हणून 16 X 35 = 560 रुपये मजुरी द्यावी लागेल.