परिमिती व क्षेत्रफळ Go Back क्षेत्रफळ views 4:56 क्षेत्रफळ :- आकृतीने व्यापलेला भाग म्हणजे क्षेत्रफळ होय . तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की, सेंटीमीटर हे लांबीचे प्रमाणित एकक आहे. क्षेत्रफळ मोजायला क्षेत्रफळाचेच प्रमाणित एकक हवे. त्यासाठी 1 सेमी बाजू असलेला चौरस हे प्रमाणित एकक म्हणून घेतात. म्हणून क्षेत्रफळाचे एकक हे चौ.सेमी मध्ये लिहितात. शेतं ,बागा, खेळाचे मैदान यांची क्षेत्रफळं मोजण्यासाठी 1 मीटर बाजू असलेला चौरस म्हणजे 1 चौमी हे प्रमाणित एकक वापरतात. तर तालुका ,जिल्हा यांसारखी मोठ्या जागेची क्षेत्रफळं मोजण्यासाठी 1 चौकिमी हे प्रमाणित एकक वापरतात. आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र : आयताचे क्षेत्रफळ = लांबी X रुंदी चौरसाचे क्षेत्रफळ : आता आपण चौरसाचे क्षेत्रफळ कसे मोजतात ते पाहू. चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू X बाजू परिमिती उजळणी आयत व चौरस यांच्या परिमितींची सूत्रे शाब्दिक उदाहरणे क्षेत्रफळ शाब्दिक उदाहरणे