बेरीज व वजाबाकी

सहा व सात अंकी संख्यांची बेरीज

views

5:13
सहा व सात अंकी संख्यांची बेरीज ज्याप्रमाणे आपण पाच अंकी संख्यांची बेरीज केली. त्याचप्रमाणे सहा ते सात अंकी संख्यांची बेरीज करायची आहे. त्यासाठी आपण काही उदाहरणांचा अभ्यास करू या. 1)3,72,624 + 2,13,748 उदाहरण 1 ) या उदाहरणात आपल्याला 3,72,624 या संख्येमध्ये 2,13,748 ही संख्या मिळवायची आहे. आपण वरील प्रमाणेच बेरीज करू. एककाच्या स्थानात १२ एकक झाले म्हणून 2 एककात लिहिले आणि 1 दशकात लिहिला. दशकात एकूण 7 दशक लिहिले. शतकाच्या घरात 13 शतक झाले म्हणून 1 हजाराच्या स्थानात लिहिला आणि 3 शतकाच्या स्थानात. आता हजाराच्या स्थानात ६ लिहिले. दशहजाराच्या स्थानाची बेरीज झाली 8 आणि लक्षच्या स्थानाची 5. हे लक्षात ठेवा की 10 दशहजार म्हणजे 1 लक्ष होतात. तर आपले उत्तर आले आहे. 5,86,372. 2)76,54,369 + 21,23,707 उदाहरण 2) या गणितामध्ये मला 76,54,369 या संख्येत 21,23,707 ही संख्या मिळवायची आहे. आपण प्रथम याची उभी मांडणी करू. तर 7654369 + 2123707 = 9778076.