बेरीज व वजाबाकी

सहा व सात अंकी संख्यांची वजाबाकी

views

3:53
सहा व सात अंकी संख्यांची वजाबाकी : ज्याप्रमाणे आपण पाच अंकी संख्यांची वजाबाकी करतो त्याचप्रमाणे सहा आणि सात अंकी संख्यांची वजाबाकी करता येते. काही उदाहरणांचा अभ्यास करून आपण ही गोष्ट समजून घेऊ या. मनातल्या मनात हातचा घेऊन वजाबाकी : ज्याप्रमाणे आपण मनातल्या मनात हातच्याची बेरीज केली तशीच मनातल्या मनात हातच्याची वजाबाकीही करता येते. याचे उदाहरण पाहू. 3 4 6 1 0 5 8 - 2 7 0 4 5 7 9 _____________ 0 7 5 6 4 7 9 वरील उदाहरणात आपण सर्व हातचे मनात घेतले आहेत. जसे 8 एककातून 9 एकक जाणार नाही म्हणून आपण शेजारच्या घरातील 1 दशक घेतला. म्हणजे आता एककाच्या घरात पूर्वीचे 8 एकक व हा 1 दशक म्हणजेच 10 एकक मिळून 18 एकक झाले आहेत. आणि आपण 18 एककातून 9 एकक वजा केल्या नंतर एककाच्या घरात शिल्लक 9 एकक राहिले. या ठिकाणी आपण कुठे ही घेतलेला हातचा म्हणजेच दशक दाखवला नाही. तर तो मनात पकडला आहे.