मापनावरील उदाहरणे

बेरजेची उदाहरणे सोडवूया

views

2:32
आता आपण आणखी काही उदाहरणे सोडवू. उदाहरण 1 ) २७ किग्रॅ 125 ग्रॅम + 12 किग्रॅ 980 ग्रॅम =? सर्वप्रथम आपण दिलेले एकक त्या त्या एककाच्या रकान्यात लिहू. पहा : ग्रॅम या एककतील अंकाची बेरीज होईल 125+ 980 = 1105. आणि 1105 ग्रॅम म्हणजे 1किलो आणि 105 ग्रॅम. 1हा हातचा किलोग्रॅम या एककात ७ च्या डोक्यावर मांडला. आणि ग्रॅम या एककात 105 लिहिले. आता किग्रॅ एककातील अंकांची बेरीज 7 + 2 = 9 झाली. व हातचा 1मिळून एकूण 10 झाले.10 तील शून्य खाली उत्तरात लिहून दशक स्थानातील २ च्या डोक्यावर 1 हातचा लिहिला . आता यांची बेरीज केली असता 2 + 1= 3 व हातचा 1 मिळून झाले =4. म्हणून २७ किग्रॅ 125 + 12 किग्रॅ 980 ग्रॅम = 40 किग्रॅ 105 ग्रॅम होतात. उदाहरण 2) 22 मीटर 50 सेंटीमीटर + 25 मीटर 75 सेंटीमीटर =? 50 सेमी + 75= 125 सेंटीमीटर , 1 मी = 100 सेंटीमीटर. म्हणून 125 सेंटीमीटर म्हणजे १ मीटर 25 सेंटीमीटर. आता हा हातचा मीटर या एककात मांडला. आणि 25 सेंटीमीटर मध्ये खाली उत्तरात लिहिले. नंतर २२ + 25 यांची बेरीज करून त्यात 1 हातचा मिळवला तर एकूण बेरीज झाली 25+22=47+1=48. म्हणून २२ मी 50 सेमी + 25मी 75 सेमी = 48 मी 25 सेमी