मापनावरील उदाहरणे Go Back गुणाकाराची उदाहरणे सोडवू views 3:26 आतापर्यंत आपण मापनावरील बेरीज आणि वजाबाकीची बरीच उदाहरणे पाहिली. आता आपण काही गुणाकाराची उदाहरणे सोडवू. उदाहरण : समजा एका ड्रेस साठी ३ मीटर 25 सेंटीमीटर कापड लागते, तर 4 ड्रेस साठी किती कापड लागेल ? शि: हे उदाहरण आपण दोन पद्धतीने सोडवू. रीत पहिली. १) 3 मीटर 25 सेंटीमीटर एका ड्रेससाठी लागणारे कापड २) 3 मीटर 25 सेंटीमीटर दुसऱ्या ड्रेससाठी लागणारे कापड ३) 3 मीटर 25 सेंटीमीटर तिसऱ्या ड्रेससाठी लागणारे कापड ४) 3 मीटर 25 सेंटीमीटर चवथ्या ड्रेससाठी लागणारे कापड असे चारही ड्रेसचे मिळून एकूण कापड झाले, 12 मीटर 100 सेंटीमीटर. आणि 100 सेंटीमीटर म्हणजे 1मिटर. म्हणून 12 मीटर + 1 मीटर = 13 मीटर. म्हणून 4 ड्रेससाठी एकूण 13 मीटर कापड लागेल. या रीतीमध्ये एकाच कापडाची 4 वेळा बेरीज केली आहे. प्रस्तावना बेरजेची उदाहरणे सोडवूया वजाबाकीची उदाहरणे सोडवू शाब्दिक उदाहरणे गुणाकाराची उदाहरणे सोडवू भागाकाराची उदाहरणे सोडवू